AmravatiLatest News

अमरावतीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; प्रतिबंधित चायना मांजा जप्त

अमरावती : अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पर्यावरणासाठी अत्यंत घातक आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या चायना मांजाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.

दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर ऑक्सिजन पार्कसमोर छापा टाकला. येथे एक व्यक्ती बंदी घातलेल्या चायना मांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेतले.

संशयिताची ओळख कुलदिपसिंग बलवीरसिंग टांक (वय २५, रा. सुदर्शन नगर, वडाळी) अशी पटली. तपासणीदरम्यान त्याच्या प्लास्टिकच्या पोत्यामधून मोनोकाईट फायटरच्या ४३ चक्री आणि मोनोफिल्ड गोल्ड कंपनीच्या २ चक्री — एकूण ४५ चायना मांजा चक्री जप्त करण्यात आल्या. या मालाची किंमत अंदाजे ४५ हजार रुपये आहे.

या प्रकारचा चायना मांजा पक्ष्यांसह नागरिकांना आणि पर्यावरणाला गंभीर धोका पोहोचवतो. त्यामुळे या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button