AmravatiLatest News

डॉ. उषा मोडक अमेरीका यांची गो. से. महाविद्यालयाला भेट

खामगाव : स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचलित गो. से. महाविद्यालय हे १९४७ वर्षी सुरू झालेले पश्चिम विदर्भातील एक प्रमुख महाविद्यालय आहे. ७७ वर्षामध्ये भारतामध्येच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. बरेच विद्यार्थी विविध वेळी महाविद्यालयाने या 77 वर्षांमध्ये केलेली प्रगती व उत्तरोत्तर प्रगतीपथावर असलेल्या आपल्या महाविद्यालयाला उत्सुकतेने भेट देतात. एक डिसेंबर 2025 रोजी टेक्सास अमेरिका येथे स्थित असलेल्या डॉक्टर उषा मोडक यांनी महाविद्यालयाला भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी महाविद्यालयाचा मागील 75 वर्षाचा प्रवास मांडलेली महाविद्यालयाची अमृत महोत्सवी स्मरणिका त्यांना भेट देत त्यांचे महाविद्यालयांमध्ये स्वागत केले. 1960 ते 1962 मध्ये म्हणजेच सुमारे 63 वर्षांपूर्वी या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतल्यानंतर आपले पुढील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ठाणे येथे वैद्यकीय सेवा दिलेल्या तत्कालीन विभा साने व आताच्या डॉक्टर उषा मोडक यांनी महाविद्यालयाचा बदललेला चेहरा बघून समाधान व्यक्त केले. कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये प्रदर्शित केलेली त्यांच्या महाविद्यालयीन कालावधीतील स्मरण चित्रे बघून तेव्हाच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांचे तत्कालीन प्राचार्य प्राध्यापक वर्गमित्र यांचे बाबत आठवणीबाबत प्राचार्यांची हितगुज करून त्यांनी महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर प्रगती करिता शुभेच्छा देत महाविद्यालयामधून निरोप घेतला. प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी महाविद्यालयाला भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करीत  महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्या करिता शक्य असल्यास त्यांनी निश्चित उपस्थिती द्यावी अशी विनंती केली व त्यांच्या सुदृढ व निरोगी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाच्या भेटीदरम्यान त्यांचे समवेत एडवोकेट उदय आपटे सुद्धा उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button