Amaravti GraminelectionLatest News

चांदूर बाजार नगरपरिषद निवडणूक: मुस्लिम बांधवांचा भाजपला ‘जोरदार’ पाठिंबा! विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन

चांदूर बाजार : चांदूर बाजार नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरला असून, भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. कांताबाई उबनलाल अहिर यांच्या प्रचारात आज एक महत्त्वपूर्ण वळण आले. मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने आणि एकजुटीने प्रचारात सहभाग घेत भाजपला आपला ठाम पाठिंबा जाहीर केला.

या वेळी मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते शेख इसुफ यांनी उपस्थिती दर्शवत भाजप उमेदवारांना सक्रिय समर्थन दिले.

“दिल्ली ते गल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे. जर आपण सर्वांनी एकदिलाने भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले, तर विकासकामांना निश्चितपणे वेग मिळेल आणि चांदूर बाजारचा चेहरा बदलणे शक्य होईल,” असे ठाम मत व्यक्त करत शेख इसुफ यांनी सर्व जनतेला भाजप उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

या आवाहनाला मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजपच्या प्रचार सभेवेळी परिसरात प्रचंड जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मुस्लीम समाजाच्या या मोठ्या पाठिंब्यामुळे चांदूर बाजारमधील निवडणुकीची चुरस आणखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

या वेळी उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये आनंद उर्फ टिकू अहिर, अतुल रंगवशी, मुरली माकोडे, गोपाल तिरमारे, करण खंडारे यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. नगरपरिषदेत भाजपला मिळत असलेला हा वाढता पाठिंबा निवडणुकीचा निकाल निश्चितच प्रभावित करू शकतो.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button