AmravatiLatest NewsSports

विद्यापीठाचा खेळाडू यशदीप भोगे याला एशियन आर्चरी चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक

लॉस एंजेलिस येथे होणा-या ऑलम्पिकमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते यशदीपचा सत्कार

अमरावती (दि. 27.11.2025)
               संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा खेळाडू यशदीप संजय भोगे याने बांगलादेशची राजधानी ढाका येथील आर्मी स्टेडियम येथे 7 ते 14 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या एशियन आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण कोरियाच्या खेळाडूचा पराभव करीत सुवर्ण पदकावर नाव कोरले. या स्पर्धेमध्ये आशिया खंडातील जवळपास 18 देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. अमेरिकेमधील लॉस एंजेलिस येथे 2028 मध्ये होणा-या ऑलम्पिकमध्ये यशदीप हा आर्चरी खेळ प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी यशदीप भोगे याचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून विद्यापीठाच्यावतीने सत्कार केला.
                यशदीप हा विद्यापीठाशी संलग्नित डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून रेल्वे प्रशासनामध्ये सध्या तो कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या खेळाडूने मिळविलेले हे यश विद्यापीठाचेच नाही, तर महाराष्ट्र आणि देशाचा नावलौकीक करणारे आहे, असे गौरवोद्गार याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, यशदीपचे वडील श्री संदीप भोगे उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button