Latest News

क्लिनिकबाहेर डॉक्टरला अचानक हार्ट अटॅक; पाहताक्षणी मृत्यू

क्लिनिकबाहेर उभ्या असताना डॉक्टरला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळून खाली पडले. पाहताक्षणी त्यांचा मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात घडली असून, तिचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

वाहिद हुसेन असे या डॉक्टरांचे नाव आहे. व्हिडिओमध्ये ते क्लिनिकबाहेर उभे असताना अचानक खाली कोसळताना दिसतात. तेथे उपस्थित लोकांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेऊन मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्नांना यश आले नाही.

डॉ. वाहिद हुसेन यांच्या अचानक मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी सांगितले की ते सौम्य स्वभावाचे आणि परिचित डॉक्टर होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून लोकांनी दुःख व्यक्त करत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button