नागपूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा,18 जण अटकेत

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डीसीपी नित्यानंद झा (झोन 2) यांच्या देखरेखीखाली एन.डी.पी.एस. पथकाने शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत मोठी छापेमारी केली. भारती आखाडा, इतवारी रेल्वे स्टेशन समोर ही कारवाई झाली. मुख्य आरोपी अशोक यादव उर्फ बाबाजी यासह 18 जणांना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ₹1,86,640/- रोख, 19 मोबाईल फोन, 3 दुचाकी, 10 ताशपत्त्यांचे संच, कुलर आणि इतर साहित्य समाविष्ट आहे. आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ), 4, 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अशोक यादव याच्यावर आधीही 10 गुन्हे नोंद असून तडीपार कारवाई झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, इतर आरोपींमध्ये काहींवर NDPS व गंभीर IPC कलमांखालील गुन्हे नोंद आहेत. ही कारवाई शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पथकासाठी मोठं यश ठरली आहे.”



