Latest NewsMaharashtra

शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा बँकांना कर्जवसुली थांबवण्याचा आदेश

धाराशिव : मराठवाड्यातील शेतकरी संकटात असताना धाराशीव जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. आणि थेट शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीसा पाठवल्या आहेत. बँकांच्या या नोटीसांविरोधात झी 24 तासने आवाज उठवला. झी 24 तासच्या बातमीनंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली न करण्याचे आदेश दिलेत..

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी संकटात सापडलाय. घरात खायला अन्न धान्य शिल्लक नाहीये. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जातेय. मात्र असं असलं तरी बँकांना मात्र याचं काही सोयर सुतक नसल्याचं पाहायला मिळतंय. शेतकरी संकटात सापडलेला असतानाच बँकांकडून आता कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात आलाय. धाराशिवच्या संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी SBI बँकेने नोटीसा पाठवलेत. अतिवृष्टी आणि पूरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी धीर देण्याी करज असताना बँकांनी मात्र सक्तीची कर्जवसुली सुरू केल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय.

शेतक-यांना कर्जवसुलीच्या नोटिसा आल्यानंतर आता राजकारणही तापलंय. उद्योगपतींचं कर्ज माफ होतात मग शेतक-यांवर एवढा राग का असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलाय. सहकारी बँकेत घोटाळे केलेल्या मंत्र्यांकडून वसुली करा अशा शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधलाय.

बँकांच्या या सुलतानी कारभाराविरोधात झी 24 तासने आवाज उठवला. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना बँकांनी सुरू केलेली ही वसुली कशी तुघलकी आहे हे झी 24 तासने दाखवून दिलं. झी 24 तासने ही बातमी लावून धरल्यानंतर सरकारने या बातमीची दखल घेतलीय. शेतक-यांकडून कर्जवसुली नको असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिलेत. या बातमीनंतर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन या संदर्भात बँकांना आदेश दिल्याचं फडणवीसांनी सांगितलंय.

निसर्गाच्या प्रकोपापुढे शेतकरी हतबाल झाला आहे. पावसाने एवढं झोडपलं की शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. शेतकऱ्याला आता गरज आहे ती सरकारच्या तातडीच्या मदतीची आणि आधाराची. मात्र काही बँका या किती असंवेदनशील आहेत याचाच प्रत्यय या परिस्थित देताना दिसत आहेत. मात्र झी 24 तासने शेतकऱ्यांचा आवाज होत या विरोधात भूमिका घेतली. आणि सरकारनेही दखल होत कर्जवसुलीला स्थगिती दिलीय. त्यामुळे माझ्या बळीराजा मोठा आधार मिळालाय.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काय संकट आलं आहे?
मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं आहे. घरात अन्नधान्य शिल्लक नाही आणि शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

बँकांनी शेतकऱ्यांवर काय कारवाई केली?
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील संचितपूर गावातील २७ शेतकऱ्यांना एसबीआय बँकेने कर्जवसुलीसाठी नोटीसा पाठवल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना पूरग्रस्त शेतकऱ्यांकडून कर्जवसुली न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button