Latest NewsMaharashtra

केसी गांधी शाळेचा ‘धागा-टिकली’ फतवा! पालक संतप्त, शिक्षण विभागाकडून नोटीस

कल्याण : कल्याणमधील नामांकित शाळा श्रीमती कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूल (केसी गांधी शाळा) सध्या एका वादात अडकली आहे. विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा किंवा टिकली लावण्यास, तसेच धागा, राखी किंवा बांगड्या घालण्यास बंदी घातल्याने पालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

शाळा प्रशासनाने नुकतीच एक सूचना जारी करत स्पष्टपणे सांगितले की, वरील गोष्टी शाळेत परिधान केल्या तर संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षा दिली जाईल. शाळेच्या मते, हे नियम शिस्तीचा भाग म्हणून लागू करण्यात आले आहेत. मात्र पालकांनी या निर्णयाला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

या निर्णयाविरोधात संतप्त पालकांनी ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा संघटक रुपेश भोईर यांची भेट घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर भोईर यांनी हे प्रकरण कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाकडे नेले. शिक्षण विभागाने तातडीने दखल घेत शाळेला कारणे दाखवा नोटीस पाठवली असून, तात्काळ खुलासा मागवला आहे.

दरम्यान, उबाठा गटाच्या माध्यमातूनही काही पालकांनी तक्रार नोंदवली असून, त्यांनीदेखील शिक्षण विभागाकडे सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शाळेचा ‘फतवा’ नेमका काय?

टिकली किंवा टिळा लावणे बंद

राखी, धागा, बांगड्या घालण्यास बंदी

नियम मोडल्यास विद्यार्थ्यांना शिक्षा

पालकांची भूमिका:

पालकांच्या मते, “शाळेने धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा अवमान केला आहे. मुलींनी टिकली लावणे किंवा राखी घालणे ही पारंपरिक बाब आहे. शाळेचा हा निर्णय चुकीचा आणि असंवेदनशील आहे.”

पुढील काय?

महापालिकेचा शिक्षण विभाग शाळेकडून उत्तराची प्रतीक्षा करत असून, उत्तर समाधानकारक नसेल तर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

📰 तुमचं मत काय?
शाळेने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य? धार्मिक प्रतीकांवर बंदी घालणं शिस्तीचं कारण असू शकतं का? खाली कॉमेंटमध्ये तुमचं मत नोंदवा!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button