कॅफे भेटीनंतर घडली हत्या! ‘त्या’ मेसेजनंतर घडला धक्कादायक प्रकार – नाशिकमध्ये खळबळ

दिवसेंदिवस महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या करण्यात आली. आता नाशिक जिल्ह्यातील पाथर्डीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलवलं आणि त्यानंतर त्या तरुणाची कोयत्या आणि चॉपरने अमानुष प्रकारे हत्या करण्यात आली आहे. या भयानक घटनेनंतर नाशिक जिह्ल्यात खळबळ माजली आहे.
मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावलं अन्…
गुरुवारी 25 सप्टेंबरला नाशिकच्या पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या एका रस्त्यावरील कॅफेमध्ये हा भयानक प्रकार घडला. पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या एका रस्त्यावरील निसर्ग कॉलनीतील एका कॅफेत राशिदला त्याच्या मैत्रिणीने चहा प्यायला बोलावलं होतं. त्यानंतर संबंधित तरुणीने राशिद आल्याची माहिती दिली मेसेज करुन दिली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी रशिदवर कोयत्याने आणि चॉफरने वार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पूर्वनियोजित कट…
पूर्वनियोजित कटातून तरुणाची कोयता आणि चॉपर या धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी गॅस गँगच्या टोळक्यांनी 22 वर्षीय रशिद हारून खानचा वाद झाला होता. अंबडला जोडणाऱ्या रस्त्यावरच असलेल्या दत्तनगर आणि खाडी परिसरातील रशिद राहतो. तिथे हा वाद झाला होता. त्यानंतर संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पण, पोलिसांकडून कसलीही कठोर कारवाई केली गेली नसल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.
संबंधित घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची पाहणी केली असता, मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला. तेव्हा रुग्णलायाबाहेर मोठ्या प्रमाणात नातेवाईकांनी गर्दी केली.
१. नाशिक पाथर्डी हत्याकांड नेमके काय आहे?
नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी फाट्याजवळील निसर्ग कॉलनीतील एका कॅफेत मैत्रिणीने बोलावून 22 वर्षीय राशिद हारून खान याची कोयता आणि चॉपरने निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना पूर्वनियोजित कट असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
२. हत्येची घटना कधी आणि कुठे घडली?
हत्येची घटना गुरुवारी, 25 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साडेदहा वाजता नाशिकमधील पाथर्डी फाट्याजवळील रस्त्यावरील निसर्ग कॉलनी कॅफेत घडली. राशिद हा दत्तनगर आणि खाडी परिसरातील रहिवासी होता.
३. हत्येचे कारण काय आहे?
हत्येचे मुख्य कारण महिनाभरापूर्वी गॅस गँगच्या टोळक्यांशी झालेला वाद आहे. अंबडला जोडणाऱ्या रस्त्यावर दत्तनगर आणि खाडी परिसरात वाद झाला होता. तक्रार दाखल झाली, पण पोलिस कारवाई झाली नाही, ज्यामुळे वैर वाढले आणि पूर्वनियोजित कट रचला गेला.
४. मैत्रिणीची भूमिका काय होती?
राशिदला त्याच्या मैत्रिणीने कॅफेत चहा पिण्यासाठी बोलावले. तिने हल्लेखोरांना राशिदच्या आगमनाची माहिती मेसेजद्वारे दिली. पोलिस तपासात मैत्रिणीची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर आले आहे.



