MaharashtraNashik

पत्रकारांवरील हल्ल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे काही दिवसांपूर्वी पत्रकारांवर झालेल्या गंभीर हल्ल्याने संपूर्ण पत्रकार जगतात संतापाची लाट उसळली आहे.आज या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नाशिक शहर ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये पत्रकारांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच पत्रकारांवर दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी विशेष समिती स्थापन करून त्यात पत्रकार प्रतिनिधींना स्थान द्यावे, अशी ठोस मागणी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.निवेदन देताना ग्रामीण पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते आणि पत्रकार करण सिंग बाबरी यांनी शासन व प्रशासनाने पत्रकारांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत असे आवाहन केले. त्र्यंबकेश्वर घटनेने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button