ऐन नवरात्रोत्सवात तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महागणार; पासची किंमत थेट दुपटीने वाढली!

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना यंदाच्या नवरात्रात थोडं जास्त खर्च करावं लागणार आहे. तुळजापुरात होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या व्हीआयपी दर्शन पासच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. हे नविन दर २० सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत.
देणगी पासचे दर वाढले
₹200 चा देणगी दर्शन पास आता ₹300
₹500 चा देणगी दर्शन पास आता ₹1000
स्पेशल गेस्ट रेफरल पास ₹200 वरून थेट ₹500
सकाळच्या अभिषेक पासची संख्या 300 वरून 400 पर्यंत वाढवली
ही माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानने अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू
यंदाचा नवरात्र महोत्सव 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दिवशी सायंकाळी देवीची मंचकी निद्रा सुरू होईल आणि नऊ दिवसांनी समाप्त होईल. 22 सप्टेंबर रोजी पहाटे निद्रा समाप्त होऊन दुपारी 12 वाजता विधिवत घटस्थापना होईल.
नंतर दररोज नित्योपचार पूजा आणि छबिना मिरवणूक वाघ, सिंह, हत्ती, मोर, गरुड अशा वाहनांवर काढली जाणार आहे. पोतदार कुटुंबीय ही पारंपरिक सेवा दोन पिढ्यांपासून करत आहेत. या सर्व तयारीचा आढावा संस्थानचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी घेतला.
महत्त्वाचे दिवस आणि कार्यक्रम
🔸 तारीख 🔹 घटना / पूजा
14 सप्टेंबर देवीची मंचकी निद्रा सुरू
22 सप्टेंबर घटस्थापना (दुपारी 12 वाजता)
23-25 सप्टेंबर नित्योपचार पूजा व छबिना मिरवणूक
17 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा – महोत्सव सांगता
भाविकांसाठी सूचना:
व्हीआयपी दर्शनासाठी ऑनलाइन/ऑफलाइन पास वेळेत मिळवावेत
गर्दीच्या कालावधीत योग्य नियोजन करून येणे
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक



