Latest News

ठाणे, पुण्यासह ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

महाराष्ट्र शासनाने तब्बल दोन-अडीच वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाचा जीआर अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातील अनेक दिवसांची उत्सुकता आता शमली आहे. शासनाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले ठेवण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यासह सर्व ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण निश्चित करून संपूर्ण यादी शासनाने प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी आता वेग घेणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button