Latest NewsMaharashtraWashim
वाशिम शहरातील पुसद नाका चौक परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे

वाशिम – वाशिम शहरातील पुसद नाका चौक परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अक्षरशः कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून जाताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून दररोज अपघातांच्या घटना घडत आहेत. तरीदेखील प्रशासना कडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



