अंबानींनी घेतलाय धाडसी निर्णय; Reliance च्या हितासाठीच सारंकाही, शेअरधारकांसाठी डबल धमाका

मुंबई : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स रिटेलच्या आगामी IPO बाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अलीकडेच रिलायन्सने जून तिमाहीत संमिश्र कामगिरीचे निकाल जाहीर केले असून आता मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आता त्यांच्या FMCG व्यवसायाला तयारी सुरु केली आहे. होय, रिलायन्स रिटेलच्या आगामी IPO आधी रिलायन्स आपला FMCG बिझनेस दूर करणार आहे.
या वर्षापर्यंत Demerger चे काम पूर्ण होणार असून यासाठी कंपनी सरकारकडून आवश्यक मंजुरी घेत आहे. सध्या हा व्यवसाय रिलायन्स रिटेलचा एक भाग आहे पण, लवकरच रिलायन्स इंडस्ट्रीजची एक वेगळं युनिट बनेल. रिलायन्स रिटेलचा FMCG व्यवसाय एका नवीन स्वतंत्र कंपनीत रूपांतरित केला जाईल, असे कंपनीच्या आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीच्या निकालांनंतर झालेल्या कॉन्फरन्स कॉलमध्ये सांगण्यात आले.
रिलायन्स रिटेलपासून दुरावणार FMCG बिझनेस
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ची उपकंपनी, रिलायन्स रिटेल लिमिटेड, आता तिचा FMCG व्यवसाय वेगळ्या कंपनीत विलग करणार आहे. ही नवीन कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची थेट उपकंपनी बनेल. रिलायन्स रिटेलचे CFO आणि कॉर्पोरेट डेव्हलपमेंट हेड दिनेश तळुजा यांनी 20 जुलै रोजी एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, FMCG व्यवसाय वेगाने वाढत असून कंपनीने पहिल्या तिमाहीत 4,400 कोटी रुपये कमावले आहेत, जे वर्षानुवर्षे जवळजवळ दुप्पट (2x) वाढ दर्शवते.
रिलायन्स रिटेलने या तिमाहीत 388 नवीन स्टोअर्स उघडले, ज्यामुळे एकूण स्टोअर्सची संख्या 19,600 पेक्षा जास्त झाली. व्यवहारांची संख्याही वर्षानुवर्षे 16% वाढली.



