AmravatiLatest News

विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाची प्रवेश प्रक्रिया सुरू

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभाग गेल्या तीस वर्षांपासून संशोधन आणि अध्यापनात अग्रेसर असून, विद्याथ्र्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. विभागाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्याथ्र्यांनी अभ्यासक्रमाला प्रवेश घेवून आपले भविष्य घडवावे, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट
वनस्पतीशास्त्र विभागातील एम.एस्सी. बॉटनी अभ्यासक्रम विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाकडे अधिक लक्ष देतो. प्रामुख्याने ‘प्लांट टिश्यू कल्चर’ आणि ‘मॉलेक्यूलर सिस्टीमॅटिक्स ऑफ प्लांट्स’ या दोन प्रमुख विषयांचा यात समावेश आहे. सैध्दांतिक ज्ञानाबरोबरच विद्याथ्र्यांना प्रत्यक्ष अनुभवासाठी व्यावहारिक प्रशिक्षण सुध्दा दिले जाते.

संशोधनात यश
विभागाने अनेक राष्ट्रीय संस्थांशी आणि यशस्वीपणे सामंजस्य करार केले आहेत. एन.ई.टी., सेट, गेट यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विभागाने उत्कृष्ट निकाल दिले आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करुन अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. विभागात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले जाते, त्यामुळे विद्याथ्र्यांना संशोधनाच्या नवीनतम प्रवृत्तींची माहिती मिळते.

*पायाभूत सुविधा
विभागात सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक उपकरणे, संग्रहालय, उद्यान, रेफरन्स लायब्रारी, संगणक प्रयोगशाळा तसेच डेटाबेस यांचा समावेश आहे. विद्याथ्र्यांना संशोधन आणि शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व साधने विभागामध्ये उपलब्ध आहेत.

विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास
विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास आणि करिअर घडविण्यासाठी विभागाव्दारे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. व्याख्याने, गट चर्चा, सेमिनार, कार्यशाळा, क्षेत्रभेटींच्या माध्यमातून विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते. त्याचबरोबर विद्याथ्र्यांना सुवर्ण पदके, रिसर्च स्कॉलरशिपसाठी प्रोत्साहित केले जाते.

वनस्पतीशास्त्रात करिअरच्या संधी
एम.एस्सी. बॉटनी पूर्ण केल्यानंतर विद्याथ्र्यांना संशोधन, शिक्षण, औषधनिर्माण, कृषी, पर्यावरण, जैव-पर्यटन, उद्योग आणि उद्योजकता यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.

प्रवेशासाठी संपर्क
अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छूक विद्याथ्र्यांना विभागप्रमुख डॉ. वर्षा नाठार यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button