जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन

अमरावती :- 3 मार्च जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त अमरावतीत समाजात जनजागृती करण्यासाठी विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीतून कर्णबधिर मुलांचे सामान्य जीवन घडवण्यासाठी ‘कॉक्लियर इम्प्लांट’ सर्जरीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
चला पाहूया सविस्तर रिपोर्ट..
जागतिक कर्णबधिर दिनाचे औचित्य साधून धन्वंतरी रिहॅबिलिटेशन सेंटरच्या पुढाकाराने शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘नवजात बालकाच्या कानाची तपासणी त्वरित झाली पाहिजे’ हा संदेश देत पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी यात सहभाग घेतला. धन्वंतरी सेंटर ते राजापेठ असा रॅलीचा प्रवास झाला. या उपक्रमात डॉक्टर लक्ष्मण मोरे आणि इतर मान्यवरांनीही सहभाग नोंदवला. या रॅलीतून ‘कोक्लियर इम्प्लांट’ सर्जरीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.” रॅलीत राम शिंदे, अमोल इंगोले, अमोल बानोडे, शुभम जूमडे, प्रशांत लांडे, भारती इंगोले, हर्षा काजळीकर, सुनीता टेकाम ,माधुरी बानोडे, चित्रा घटी, मनीषा ताई, पूजा खडसे ,माधुरी डुकरे ,आदिनी उपस्थिती दाखवली.
कर्णबधिर बालकांनाही सामान्य मुलांसारखे जीवन जगता यावे यासाठी अशी जनजागृती होणे आवश्यक आहे. अमरावतीतील या विशेष रॅलीने नागरिकांना महत्त्वपूर्ण संदेश दिला. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज़.



