Crime NewsLatest NewsNagpur

नागपुरात दारू दुकानात दहशत! धमकी देणारा अरबाज खान अखेर गजाआड!

नागपूर :- नागपूरमध्ये गुन्हेगारीचे सत्र वाढतच चालले आहे! कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका देशी दारू दुकानात मोठी दहशत घडली. एका गुन्हेगाराने दुकानात घुसून कामगाराला जबरदस्तीने पैसे मागितले आणि विरोध करताच त्याला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली! या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अरबाज खानला अटक केली आहे. जाणून घेऊया संपूर्ण वृत्त .

ही धक्कादायक घटना नागपूर शहराच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. रविवारी सकाळी, ताज नगर भागात राहणारा अरबाज खान हा थेट देशी दारू दुकानात घुसला आणि दुकानात काम करणाऱ्या प्रणय भंडारकर यांना जबरदस्तीने पैसे मागू लागला. कामगाराने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपीने त्याला बेदम मारहाण केली आणि ‘पैसे नाही दिले, तर ठार मारीन!’ अशी धमकी दिली.

घाबरलेल्या कामगाराने तातडीने कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने तपास करून पसार झालेल्या अरबाज खानला रविवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक शस्त्र आढळले. त्यामुळे त्याच्यावर आर्म्स अॅक्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमना पोलिसांनी आरोपीला तातडीने न्यायालयात हजर केले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.

एका देशी दारू दुकानात काम करणाऱ्या कामगाराला उघडपणे धमकी देणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे. पण नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली पाहिजे! सिटी न्यूज आपल्या हक्काच्या बातम्या घेऊन येत राहील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button