संजय देशमुख यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा – ‘भ्रष्टाचाराच्या फायली काढल्यात तर मोठा गैरव्यवहार समोर येईल!’

दिग्रस येथे रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप केले. ‘तुमच्या भ्रष्टाचाराच्या फाइल्स उघडल्या तर मोठा गैरव्यवहार समोर येईल’ असा थेट इशारा त्यांनी दिला. यासोबतच शेतकरी प्रश्न, अतिक्रमण मुद्दा आणि केंद्राच्या मदतीबाबतही त्यांनी भाष्य केले.
पाहूयात, त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण आढावा
दिग्रस शहरात रास्ता रोको आंदोलनादरम्यान खासदार संजय देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. सोयाबीन व कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे, अशी टीका त्यांनी केली. तुरीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत असून सरकार डोळेझाक करत आहे, असा आरोप त्यांनी केला. लोकसभेत आवाज उठवल्यानंतरच अतिवृष्टीसाठी 241 कोटींची मदत मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, दिग्रस शहरात अतिक्रमण हटवताना काही विशिष्ट लोकांना वाचवल्याचा आरोप त्यांनी केला.
संजय देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचार, शेतकरी प्रश्न, अतिक्रमण यावर त्यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. आता सत्ताधाऱ्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



