BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

बुलढाण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

जागतिक ख्यातीचे शल्यचिकित्सक डॉ. सुधीर श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत शिवशंकर इंगळे यांच्यावर शस्त्रक्रिया; रोबोटिक सर्जरीचा शासकीय योजनांमध्ये समावेश करण्याची मागणी

बुलढाणा : जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. जागतिक ख्यातीचे शल्यचिकित्सक आणि रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रवर्तक डॉ. सुधीर श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत शिवशंकर इंगळे यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रियेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय सेवेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची नवी सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, एसएस मंत्रा रोबोटिक्स कंपनीने तब्बल १६ कोटी रुपये किमतीचा भारतीय बनावटीचा रोबोटिक सर्जिकल रोबोट राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिला आहे. या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, रोबोटिक शस्त्रक्रियेचा समावेश शासकीय आरोग्य योजनांमध्ये करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केली आहे. या सुविधेचा लाभ सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांनाही मिळावा, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सिटी न्यूजचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा बुलढाण्यातून विशेष रिपोर्ट

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button