AmravatiAmravati Policscitynews

शिशू विक्री प्रकरणात डॉक्टर भोजने दाम्पत्याला १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी!

फ्रेजरपुरा पोलिसांकडून वैशाली भोजने आणि प्रफुल्ल भोजने यांना न्यायालयात हजर; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

अमरावती : शिशू विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉक्टर वैशाली भोजने आणि प्रफुल्ल भोजने या दाम्पत्याला न्यायालयाने १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी (पीसीआर) मंजूर केली आहे. आज फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते.

या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश भट्टाचार्य यांच्या न्यायालयात झाली. यावेळी पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर डॉक्टर वैशाली भोजने आणि प्रफुल्ल भोजने यांना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

शिशू विक्री प्रकरणात या डॉक्टर दाम्पत्याची भूमिका काय होती, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या कथित व्यवहारामागील संपूर्ण साखळी काय आहे, याचा तपास आता फ्रेजरपुरा पोलीस करणार आहेत.

या प्रकरणातील पोलीस कोठडीदरम्यानच्या चौकशीतून शिशू विक्री प्रकरणाचे आणखी धागेदोरे समोर येतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button