AmravatiAmravati PolicscitynewsCrime News

FCI मध्ये नोकरीचे आमिष दाखवून बहीण-भावाची ६२ लाखांची फसवणूक!

बनावट आयडी तयार करून फसवणुकीत मदत केल्याचा आरोप; शिवम सेनला अटक, २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बहीण-भावाची तब्बल ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण अमरावतीत समोर आले आहे. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी मध्य प्रदेशातील शिवम सेन याला नागपूर कारागृहातून प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन अटक केली आहे. बनावट आयडी तयार करून फसवणुकीत मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. न्यायालयाने त्याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

FCI मध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत बहीण-भावाकडून ६२ लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शिवम सेन याने बनावट आयडी तयार करून फसवणुकीस मदत केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागपूर कारागृहात असलेल्या शिवम सेनला राजापेठ पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेत अटक केली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ आप्पा गेडाम याच्यासह अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. फसवणुकीच्या या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच बनावट आयडीचा वापर कशा प्रकारे करण्यात आला, याचा तपास पोलीस करीत आहेत. न्यायालयाने शिवम सेनला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असून, पुढील तपास राजापेठ पोलिसांकडून सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button