AccidentNewsAchalpurAmravati Gramincitynews

परतवाडा-बहीरम मार्गावर दोन दुचाकींची धडक; माजी सभापती राजेंद्र गोरले गंभीर जखमी

अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत; प्राथमिक उपचारांनंतर अमरावतीला हलवले

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-बहीरम मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भाऊ गोरले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आले आहे.

परतवाडा-बहीरम मार्गावर दोन दुचाकींची धडक होऊन अपघात घडला. या अपघातात अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भाऊ गोरले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर जखमी राजेंद्र गोरले यांना परतवाडा येथील डॉ. अभिजीत कडू आणि डॉ. भन्साली यांच्याकडे प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button