AmravaticitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics

अमरावती शिक्षक मतदारसंघातून संगीता शिंदे यांचा नामांकन अर्ज दाखल

शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल; शिक्षकांच्या प्रश्नांसाठी निवडणूक लढणार असल्याचे शिंदे यांचे स्पष्टीकरण

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी सौ. संगीता सचिन शिंदे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात आणखी एका उमेदवाराची भर पडली आहे.

नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संगीता शिंदे यांनी आपल्या उमेदवारीमागील भूमिका स्पष्ट केली. मागील निवडणुकीतही आपण बंडखोरी करत भाजपच्या उमेदवाराविरोधात नामांकन अर्ज दाखल केला होता, असे त्यांनी सांगितले.

महायुतीच्या उमेदवारीवरून शिंदे यांची भूमिका

यावेळी महायुतीकडून किरण सरनाईक यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या उमेदवारीबाबत बोलताना संगीता शिंदे यांनी आपण भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या असून शिक्षकांसाठी काम करण्याच्या भूमिकेतून निवडणूक लढवत असल्याचे सांगितले.

शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आपण सातत्याने काम करत असून त्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची आज अंतिम मुदत असल्याने शेवटच्या दिवशीही विविध उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे आता अर्ज छाननीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button