जाफर नगरातील नागरी समस्यांचा सिटी न्यूजने घेतला ग्राउंड रिपोर्ट!

प्रभाग क्रमांक १० आणि ११ मधील रस्ते, कचरा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर ॲड. सिद्दीकींचा सातत्याने आवाज
नागपूर : नागपूर शहरातील जाफर नगर परिसरातील प्रभाग क्रमांक १० आणि ११ मधील ग्राउंड परिस्थितीचा सिटी न्यूजने आढावा घेतला. या परिसरातील रस्ते, कचरा आणि नागरिकांशी संबंधित विविध समस्या सातत्याने समोर येत असून, या प्रश्नांवर ॲडव्होकेट आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्दीकी सक्रियपणे आवाज उठवत असल्याचे पाहायला मिळते.
जाफर नगर परिसरात रस्त्यांची कामे सुरू असताना निर्माण झालेल्या समस्यांपासून ते रस्त्यावर पडलेल्या लोखंडी शटरपर्यंत विविध मुद्द्यांकडे सिद्दीकी यांनी लक्ष वेधले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय परिसरातील कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची अवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी याबाबतही सिद्दीकी सातत्याने आवाज उठवत असल्याची माहिती आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.
सिटी न्यूजच्या माध्यमातून जाफर नगर परिसरातील नागरिकांच्या ज्वलंत समस्या समोर आणण्याची संधी मिळाल्याबद्दल ॲडव्होकेट सिद्दीकी यांनी सिटी न्यूजचे आभार मानले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १० आणि ११ मधील रस्ते, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.



