Amaravti GramincitynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

दत्तापूर-धामणगाव रेल्वेत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह

भव्य मिरवणुकीत भक्तिभावासोबत सामाजिक एकता आणि बंधुभावाचे दर्शन; पोलिसांचा चोख बंदोबस्त

दत्तापूर आणि धामणगाव रेल्वे परिसरात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह पाहायला मिळाला. आठवडी बाजारातून निघालेल्या भव्य मिरवणुकीत भक्तिभावासोबतच सामाजिक एकता आणि बंधुभावाचे दर्शन घडले. आकर्षक देखावे, सुंदर सजावट आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारून गेला.

पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त दत्तापूर येथील आठवडी बाजारातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

आकर्षक धार्मिक देखावे, सुंदर सजावट आणि हिरव्या झेंड्यांनी संपूर्ण परिसर सजला होता. मिरवणुकीत बालकांपासून युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.

पारंपरिक वेशभूषेतील बालकांनी विशेष लक्ष वेधून घेतले, तर युवकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. मिरवणूक प्रमुख मार्गाने धामणगाव रेल्वे शहराच्या दिशेने पुढे सरकत असताना ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

ईद-ए-मिलादुन्नबीच्या माध्यमातून प्रेम, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. मिरवणूक शांततेत पार पडावी आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी दत्तापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

या मिरवणुकीतून दत्तापूर आणि धामणगाव रेल्वे परिसरातील सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मीय ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.

भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक शांततेत पार पडली. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे संपूर्ण कार्यक्रमाला शिस्तबद्ध स्वरूप मिळाले.

सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button