City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNanded

नांदेड हादरलं! ४८ तासांत पाच खून; मॉर्निंग वॉकलाही धोका? शहरात भीतीचं सावट

नांदेड | प्रतिनिधी
नांदेड शहरात अवघ्या ४८ तासांत सलग पाच खुनांच्या घटनांनी संपूर्ण शहर हादरलं असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शहरातील श्रीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या ताज्या घटनेने नागरिकांचा थरकाप उडवला आहे. सोनू कल्याणकर (वय ३७) हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मात्र, त्यांना याची कल्पनाही नव्हती की हा त्यांचा शेवटचा वॉक ठरेल.

माहितीनुसार, अचानक मोटरसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी सोनू कल्याणकर यांच्यावर चाकूने सपासप वार केले. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलं आहे. विशेष म्हणजे, ही घटना मागील ४८ तासांत घडलेला पाचवा खून असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या गॅंगवॉर आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या साखळी हत्यांमागचं नेमकं कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात असून, “आम्ही सुरक्षित आहोत का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवर दबाव वाढला आहे.

नांदेडमधील ही परिस्थिती केवळ गुन्हेगारीचा प्रश्न नसून प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात आहे. गुन्हेगारांवर कडक कारवाई कधी होणार आणि शहरात कायदा-सुव्यवस्था कधी प्रस्थापित होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button