मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राज्यातील पहिला ‘पाणी सप्ताह’ हाडोळी येथे उत्साहात
भोकर प्रतिनिधी :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महाराष्ट्रातील पहिल्या ‘पाणी सप्ताह’ उपक्रमाचे आयोजन भोकर तालुक्यातील हाडोळी गावात करण्यात आले. हाडोळी ग्रामपंचायत आणि सेवा समर्पण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सात दिवस चाललेल्या या पाणी सप्ताहात पाणी संवर्धन, जनजागृती, स्वच्छता आणि श्रमदानाच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात आली. गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले असून मुलांसाठी खेळण्यासाठी सुंदर बाग विकसित करण्यात आली. भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी तब्बल १०० जलतळ्यांची निर्मिती करण्यात आली.
उपक्रमाच्या समारोप प्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते. त्यांनी गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानाचे कौतुक करत शासनाच्या योजना लोकसहभागातून प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचे सांगितले. “आमचे गाव क्रमांक एकच्या दिशेने वाटचाल करत आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
गावातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
बाईट – खा. अशोक चव्हाण :
(गावाच्या प्रगतीबद्दल आणि लोकसहभागाबद्दल प्रतिक्रिया)
बाईट – माधवराव अमृतवाड, सरपंच :
(ग्रामपंचायतीच्या पुढाकाराबद्दल माहिती)
बाईट – दिगंबर देशमुख, सेवा समर्पण परिवार अध्यक्ष :
(सप्ताहातील उपक्रम आणि भविष्यातील योजना)



