JalnaLatest News

भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

भोकरदन : विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना व्यावहारिक जगाची ओळख करून देण्यासाठी भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मराठी व उर्दू) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २३ जानेवारी रोजी ‘बाल आनंद मेळावा’ (Canteen Day) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याने केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे, तर संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

७५ स्टॉल्स आणि चविष्ट खाद्यपदार्थ

या मेळाव्यात दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी मिळून एकूण ७५ स्टॉल्स लावले होते. यात घरगुती बनवलेले पौष्टिक पदार्थ, चविष्ट स्नॅक्स आणि विविध पेयांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी स्वतः स्टॉलची सजावट करून ग्राहकांशी संवाद साधत विक्रीचे कौशल्य आत्मसात केले.

मिळाले उल्लेखनीय यश

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी केवळ आनंदच घेतला नाही, तर आर्थिक नियोजनाचा आदर्शही घालून दिला.

  • उर्दू शाळा: २१,००० रुपयांची विक्री
  • मराठी शाळा: १५,००० रुपयांची विक्री एकाच दिवसात तब्बल ३६,००० रुपयांची उलाढाल करत विद्यार्थ्यांनी आपल्यातील ‘उद्योजक’ सिद्ध केला.

मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक

कार्यक्रमाचे उद्घाटन वडोद केंद्राचे केंद्रप्रमुख मा. विलास पळसकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष सय्यद शोएब, पत्रकार मजहर पठाण, मुस्तफा पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक शाकीर कुरेशी सरभानुदास काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

पालक आणि गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पीएम श्री धावडा हायस्कूल, डॉ. नसीम उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक या मेळाव्यास उपस्थित होते. “अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना पैशांचे महत्त्व समजते,” अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button