AmravatiLatest News

अ.भा. आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री (पुरूष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक येथे 15 फेब्राुवारी, 2026 रोजी होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री (पुरूष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखलीचा आकाश बरवाल, वैभव बंदे व गौरव भारड, डॉ. एस. मुखर्जी महाविद्यालय, शेंदुरजनाघाटचा पियुष मसने व प्रज्वल हरले, बॅरि. आर.डी.आय.के. महाविद्यालय, बडनेराचा प्रतिक गेडाम व नितीन हिवराळे, डॉ. एच.एन. सिन्हा महाविद्यालय, पातुरचा करण चव्हाण आणि श्रीमती नरसम्मा महाविद्यालय, किरणनगर, अमरावतीचा मुकेश उईके याचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे 03 ते 12 फेब्राुवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button