नगरपरिषद–नगरपंचायत निकालांची सुरुवात

महायुती 181 जागांवर आघाडीवर; भाजप सर्वात मोठा पक्ष
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांची प्रक्रिया सुरू झाली असून, प्राथमिक निकालांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. सध्या महायुती 181 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली असून, पहिल्या काही फेऱ्यांमध्येच महायुतीच्या उमेदवारांनी मुसंडी मारली आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे असल्याचे प्राथमिक निकालांतून समोर येत आहे.
नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला मतदारांनी भक्कम पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. निकालांच्या सुरुवातीलाच महायुतीची आघाडी स्पष्ट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांत अंतिम चित्र अधिक स्पष्ट होणार असून, निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



