Latest NewsMaharashtrapolitics

दणदणीत विजयाने अजित पवारांची बारामतीवर मोहोर, शरद पवारांना मोठा धक्का!

बारामतीतील नगरपालिकेच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्षात नेमकी कोणाची सरशी होणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर आलेल्या निकालांनी सर्व चित्र स्पष्ट केलं असून, अजित पवारांनी शरद पवारांना दणदणीत पराभवाचा धक्का दिला आहे.

बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ पैकी तब्बल ३५ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. शरद पवार गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे बारामतीवर अजित पवारांची पकड अधिक मजबूत झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


बारामतीचा अंतिम निकाल

नगराध्यक्ष :
▶️ सचिन सातव – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

नगरसेवक बलाबल

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 35
  • अपक्ष – 3
  • बसपा – 1
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 1
  • रासप – 1

एकूण नगरसेवक : 41 + 1 नगराध्यक्ष

➡️ एका अपक्ष उमेदवारावर आक्षेप घेतला असून, त्यामुळे एका जागेचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.


पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची (अजित पवार) घोडदौड

पुणे जिल्ह्यातील ९ ठिकाणी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत.

  1. लोणावळा
  2. दौंड
  3. शिरूर
  4. इंदापूर
  5. जेजुरी
  6. भोर
  7. बारामती
  8. फुरसुंगी
  9. वडगाव मावळ (नगरपंचायत)

इंदापूर – अंतिम निकाल

नगराध्यक्ष :
▶️ भरत शहा – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

नगरसेवक बलाबल

  • राष्ट्रवादी – 14
  • स्थानिक आघाडी – 6

एकूण : 20 + 1 नगराध्यक्ष


दौंड – अंतिम निकाल

नगराध्यक्ष :
▶️ दुर्गादेवी जगदाळे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

नगरसेवक बलाबल

  • राष्ट्रवादी – 11
  • जनहित विकास आघाडी – 15

एकूण : 26 + 1 नगराध्यक्ष


माळेगाव – अंतिम निकाल

नगराध्यक्ष :
▶️ सुयोग सातपुते – जनमत विकास आघाडी

नगरसेवक बलाबल

  • जनमत विकास आघाडी – 12
  • अपक्ष – 5

एकूण : 17 + 1 नगराध्यक्ष


सासवड – अंतिम निकाल

नगराध्यक्ष :
▶️ आनंदी जगताप – भाजपा

नगरसेवक बलाबल

  • भाजपा – 13
  • शिवसेना (शिंदे गट) – 9

एकूण : 22 + 1 नगराध्यक्ष


जेजुरी – अंतिम निकाल

नगराध्यक्ष :
▶️ जयदीप बारभाई – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

नगरसेवक बलाबल

  • राष्ट्रवादी – 17
  • भाजपा – 2
  • अपक्ष – 1

एकूण : 20 + 1 नगराध्यक्ष

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button