AmravatiLatest NewsMaharashtra
अमरावतीत सफाई कामगारांचा संताप; पगार न मिळाल्याने मनपा आयुक्तांच्या कॅबिनबाहेर आंदोलन

अमरावती – महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ३ मधील सफाई कामगारांनी दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने गुरुवारी मनपा आयुक्तांच्या कॅबिनबाहेर आंदोलन केले. कामगारांचा संताप खाजगी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे वाढला आहे.
झोन क्रमांक ३ अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांनी सांगितले की, रोज शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर मेहनत घेऊनही त्यांच्या पगाराबाबत प्रशासन आणि कंत्राटदार उदासीन आहेत. गुरुवार सकाळपासूनच मनपा मुख्यालयात कामगारांची मोठी गर्दी दिसली. कामगारांनी ठामपणे सांगितले की, जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.
मनपा प्रशासनाने कामगारांना आश्वासन दिले आहे की, लवकरच तोडगा काढण्यात येईल आणि कंत्राटदाराविरुद्ध आवश्यक कारवाई केली जाईल.



