citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpur

जरीपटका हद्दीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १९ वर्षीय युवकासह २.०२ लाखांचा गांजा जप्त

जरीपटका पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ पथकाने एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई करत गांजा विक्रीसाठी फिरणाऱ्या १९ वर्षीय युवकाला रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणातील एक मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. नागपूर गुन्हे शाखेने सांगितले की, गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत.


गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार युनिट क्रमांक ५ च्या पथकाने जरीपटका परिसरात सापळा रचला.
दरम्यान, मोहम्मद कॅफ मोहम्मद जाफर (वय 19) हा संशयित युवक गांजाखेत चौक – मोमिनपूरा परिसरात पोलिसांच्या हाती लागला.


2.02 लाखांचा मुद्देमाल जप्त

युवकाच्या ताब्यातून

  • खाकी टेपमध्ये पॅक केलेले गांजाचे ४ बंडल,
  • रोख ₹200,
  • गांजा वाहतुकीसाठी वापरलेली ट्रॉली बॅग

असा मिळून ₹2,02,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक तपासात हे समोर आले की युवक अवैध गांजा विक्रीसाठी फिरत होता.


मुख्य आरोपी फरार

या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल पटेल (रा. रायपूर, छत्तीसगड) हा फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.


एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल

या विरोधात
कलम 8(क), 20(ब) II (ब), 29
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.


पुढील तपास सुरू

या कारवाईचा पुढील तपास सपोनि गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button