AmravatiLatest NewsLocal News

विद्यापीठात आहार मार्गदर्शन व मोफत रक्त तपासणी शिबीर संपन्न

अमरावती
                 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य केंद्राच्यावतीने मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनींकरीता मोफत आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  विद्यापीठ परिसरातील विद्याथ्र्यांचे आरोग्य जतन करण्याच्या उद्देशाने हा महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.  यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, आहार तज्ज्ञ डॉ. दिपाली भैसने, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात व वसतिगृह अधीक्षक श्री चंद्रशेखर लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                 मार्गदर्शन करतांना आहार तज्ज्ञ डॉ. दिपाली भैसने यांनी तरुणांमधील ह्मदयविकार आणि मधुमेह टाळण्यासाठी विद्याथ्र्यांनी हेल्दी चॉईस ऑफ फुड निवडण्याचे आवाहन केले.  शरीर सुदृढ राहण्याकरीता घरी बनविलेले अन्न व फळे यांचा जास्तीतजास्त आहारात समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
                अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी योग्य आहाराबरोबरच व्यायाम सुद्धा आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा घटक असल्याचे सांगून तरूण पिढीने मोबाईलच्या विळख्यामध्ये न अडकता मैदानी खेळ खेळण्यासाठी विद्याथ्र्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले.
                प्रास्ताविकतेतून विद्यापीठ आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.  कार्यक्रमाचे संचालन कु. मोहिनी राठोड हिने केले.  रक्त तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील चमूने सहभाग घेतला.  शिबीरामध्ये एकूण 53 मुले व 46 मुलींनी लाभ घेतला.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आरोग्य विभागातील श्री सचिन बाळापुरे यांनी अथक परिश्रम घेतले.  

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button