Uncategorized
धनतेरसनंतर सोन्याच्या भावात मोठी घसरण; ५ दिवसांत १० हजारांची पडझड

धनतेरसच्या दिवशी १ लाख ३५ हजार रुपयांवर पोहोचलेले सोने मागील पाच दिवसांपासून सतत घसरत असून सध्या १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत आले आहे. या मोठ्या घसरणीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
अर्थतज्ज्ञांच्या माहितीनुसार, दोन दशकांनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या किमतींमध्ये एका दिवसात ६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. मागील काही दिवसांत ज्यांनी सोने विकत घेतले, त्यांना संभाव्य तोट्याची भीती आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरची मजबुती आणि व्याजदरातील बदल या घटकांमुळे ही घसरण झाली आहे. मात्र, ही दीर्घकालीन घसरण आहे की केवळ बाजारातील ‘करेक्शन’, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
सोन्याच्या भावातील ही अनपेक्षित घसरण बाजारातील गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक दोघांसाठीही चर्चेचा विषय ठरली आहे.



