Accident NewsLatest NewsMaharashtra

दारूच्या नशेत मुलीचा खून, पत्नीवर प्राणघातक हल्ला

मुंबई (20 ऑक्टोबर 2025): सांताक्रुज येथील कालिना परिसरात आपल्या 14 वर्षीय मुलीची हत्या करून पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी पित्याला अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मोहम्मद सुलेमान रज्जाक कुजरा असे आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे.

ही धक्कादायक घटना तीन दिवसांपूर्वी, बुधवारी रात्री शिवनगर चाळीत घडली होती. मोहम्मद सुलेमान याने मद्यधुंद अवस्थेत आपली मुलगी अजगरी हिचा गळा आवळून खून केला, तसेच पत्नी नसीमा मोहम्मद कुजरा हिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर तो पळून गेला होता.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत बिहारमधील त्याच्या गावातून त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी वाकोला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button