धारणी फटाका व्यापाऱ्यांवर पावसाने दिवाळीवर पाणी फेरलं

धारणी तालुक्यातील शेकडो गावांमध्ये दिवाळीच्या पहाटेच मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी धारणी शहरासह बाजारपेठेत अक्षरशः पाणीचं साम्राज्य पसरलं. फटाका विक्रीसाठी उभारण्यात आलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. नगर पंचायत कार्यालयाकडून कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती. या बाजारात तात्पुरत्या लायसन्सवर विक्री करणारे काही व्यापारी प्रशासनाकडून परवानगी घेऊन दुकानं उघडले होते. पण या तात्पुरत्या परवान्यांमुळे गेल्या ४० ते ५० वर्षांपासून व्यवसाय करत असलेल्या जुन्या विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागला. स्थानिक नागरिकांनी सांगितलं की, तात्पुरत्या लायसन्सधारकांनी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन भविष्यातील नियोजन ठोसपणे करावं, अशी मागणी धारणीतील व्यापारी वर्ग आणि नागरिकांनी केली आहे.”



