गो. से. महाविद्यालयात BCA च्या विद्यार्थ्यांसाठी दिक्षारंभ कार्यक्रम संपन्न

खामगाव – स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, येथे BCA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दिक्षारंभ (Induction Program) चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर व प्रमुख पाहुणे संगणकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. ए. ए. तायडे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात स्व. भाऊसाहेब उपाख्य शंकररावजी बोबडे यांच्या प्रतिमेला हारार्पण व दीप प्रज्वलन करून झाले. प्रा. डॉ. ए. ए. तायडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून दिक्षारंभ कार्यक्रमाचे महत्व विशद केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. डी. एस. तळवणकर यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली तसेच महाविद्यालयात असलेल्या विविध योजनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम करिअर कट्टा संदर्भात माहिती सांख्यिकी विभागप्रमुख व करिअर कट्टा बुलढाणा जिल्हा समन्वयक डॉ. व्ही. एस. आठवार यांनी दिली. या कार्यक्रमामध्ये कु. निकिता गई व सोमेश भागवत या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलीत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कीर्ती चोपडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. निलेश तांबट यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. कीर्ती शहा, प्रा. मनीषा तांगडे, शिवाजी मुळीक यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



