Uncategorized

25 टन लाकडांनी भरलेला 14 टायरी ट्रकचा भीषण अपघात

लातूर तालुक्यातील खोपेगाव पाटीजवळ रात्री उशिरा एक 14 टायरी ट्रक (क्रमांक MH-24-AU-6998) अपघातग्रस्त झाला. ही ट्रक लाकडं तोडून भरून नेत होती. अपघात एवढा भीषण होता की, ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला आणि मोठ्या प्रमाणात लाकडं रस्त्यावर विखुरली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रकमध्ये सुमारे 20 ते 25 टन लाकडाचा साठा भरलेला होता. हा ट्रक कोणत्या ठिकाणाहून लाकूड घेऊन निघाला होता आणि कुठे जात होता याचा तपास सुरू आहे. अपघाताची घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने, अंधारात बचावकार्य करणे थोडे अवघड ठरले. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावरील अडथळा दूर करण्याचे काम हाती घेतले. सुदैवाने या घटनेत चालक आणि क्लीनर दोघेही किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, मात्र पोलीसांनी ट्रक हटवून वाहतूक सुरळीत केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button