Uncategorized

मध्यरात्री घरात शिरला विषारी कोबरा, सर्पमित्रामुळे पाच जणांचा जीव वाचला

नागपूर – नागपूरच्या सेमिनरी हिल्स परिसरातील सुप्रसिद्ध Professional Wildlife Rescuer शुभम जी.आर यांनी पुन्हा एकदा जीव वाचवण्याची मोठी कामगिरी बजावली आहे. ही घटना घडली नागपूरच्या भीसेनखोरी परिसरात, जिथे एका कुटुंबाच्या घरात रात्री उशिरापर्यंत एक विषारी कोबरा साप घुसला होता.
रात्री घरात शांतपणे बसलेला हा साप सकाळी सुमारे सातच्या सुमारास घरच्यांच्या नजरेस पडला. साप पाहताच कुटुंबातील पाचही सदस्य भीतीने आणि दहशतीने थरथर कापू लागले. तात्काळ या घटनेची माहिती वाइल्ड अ‍ॅनिमल्स अँड नेचर हेल्पिंग सोसायटीचे अध्यक्ष शुभम जी.आर यांना देण्यात आली.
शुभम जी.आर यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. योग्य उपकरणांच्या साहाय्याने त्यांनी शांतपणे आणि कौशल्याने विषारी कोब्राला सुरक्षितपणे पकडलं. यानंतर त्या सापाला कुठलीही इजा न करता जंगलात सोडण्यात आलं. तज्ञांच्या माहितीनुसार, कोब्राच्या दंशामुळे फक्त ४० ते ४५ मिनिटांतच माणसाचा मृत्यू होऊ शकतो, कारण त्याच्या विषामध्ये Neurotoxic Venom आढळतो जो मेंदू आणि नसांवर थेट परिणाम करतो.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button