Uncategorized

दोन अल्पवयीन मुलांकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात एकाच मृत्यू

नागपूर – १५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ईमामवाडा, नागपूर येथील बार सिग्नल जवळील बोरकर नगर नाल्यात एक भयानक घटना घडली. इंदिरा नगर, जाट तरोडी येथील निलेश उर्फ बाळा किरण अंबाडारे (वय ३४) यांच्यावर दोन १६ वर्षीय अल्पवयीन मुलांनी पैशाच्या वादावरून हल्ला केला. अल्पवयीन आरोपींनी निलेश याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली, त्याच्या पोटावर व शरीरावर चाकूने वार केला तसेच तोंडावर दगड मारला. या हल्ल्यामुळे पीडित गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने मेडीकल हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीतून पोउपनि. ठवरे यांनी त्वरीत कारवाई करत, दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. गुन्हा भारतीय दंडसंहितेच्या कलम १०३(१), ३(५) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, पोलीस तपासादरम्यान अधिक माहिती उघड करणार आहेत.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button