अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काढणार विद्यापीठावर मोर्चा

गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती विद्यापीठाच्या कामकाजात ढासाळपणा आणि निष्क्रियता दिसून येत आहे. अभाविपच्या मते, विद्यापीठ प्रशासन प्रवेश, परीक्षा, निकाल, पाठ्यक्रम आणि पदभरतीसारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये वेळेवर व योग्य निर्णय घेण्यात अपयशी ठरत आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर प्रवेश मिळत नाही, परीक्षा प्रक्रियेत अडचणी, हॉल तिकीट आणि परीक्षा केंद्रांवरील असुविधा यामुळे गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होतो. निकाल वेळेत न लागणे आणि योग्य रितीने जाहीर न होणे – अशा कारणांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन धोक्यात आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताने विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात मोर्चा आणि आंदोलन घोषित केले आहे. या मोर्चाचे टप्पे ठरवण्यात आले आहेत:
१ ते १० ऑक्टोबर: समस्या शोध अभियान
१५ ऑक्टोबर: छात्रनेता संमेलन
१६ ऑक्टोबर: पत्रकार परिषद
२६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर: विद्यार्थी संपर्क अभियान
०७ नोव्हेंबर: महाविद्यालय बंद आंदोलन
१४ नोव्हेंबर: विद्यापीठ मोर्चा
विद्यार्थी नेता प्रदेश मंत्री म्हणाल्या की महाविद्यालय हे चरित्रनिर्मितीचे केंद्र आहे आणि शिक्षण हेच जीवन आहे. झोपलेल्या प्रशासनाला जागृत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही चळवळ आवश्यक आहे. अभाविपच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा मोर्चा प्रशासनावर दबाव आणणार असून, प्रवेश, परीक्षा, निकाल, पाठ्यक्रम, पदभरती, शिष्यवृत्ती, वसतिगृह, NEP अंमलबजावणी आणि छात्र संघ निवडणुकांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश असेल.”



