AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठातील मानसशास्त्र विभागात जनजागृती कार्यशाळा संपन्न

               संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मानसशास्त्र विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयामधील मानसोपचार विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य जनजागृती सप्ताहानिमित्त “मानसिक आरोग्याची पायाभूत माहिती : आजार, उपचार, नैदानिक दृष्टिकोन” या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. प्रमुख वक्ते जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, विशेष अतिथी म्हणून समुपदेशक श्री मंगेश घोडेस्वार, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. श्रध्दा हरकंचे उपस्थित होते.
               डॉ. अमोल गुल्हाने यांनी मानसिक आजारांचे विविध प्रकार, उपचार पध्दती, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची विद्याथ्र्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्याथ्र्यांच्या शंकांचे निरसन केले. श्री. मंगेश घोडेस्वार यांनी मानसिक आरोग्य जागृतीचे महत्त्व पटवून दिले. डॉ. श्रध्दा हरकंचे यांनी राग, तणाव, चिंता अशा भावनिक अडचणी कमी करण्यासाठी विविध मानसशास्त्रीय तंत्रांची माहिती दिली.
                श्री. राजू इंगोले प्रभारी समन्वयक यांनीही विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करुन अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने घेण्यात येतील, असे सांगितले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता प्रा. मंजुषा लकडे, प्रा. ऋतुजा ठाकरे, प्रा. दिग्विजय कडू, प्रा. अभिजित खंडारे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेला मोठ¬ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button