अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी पोलिसांचा ताब्यात

आज दिनांक 28/9/2025 रोजी मुऱ्हा देवी येथील फिर्यादी यांनी रहिमापूर पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली की दुपारी ३:३० ते ४:३० वाजता दरम्यान फिर्यादीची ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही मुऱ्हा देवीचे यात्रेत जंपिंग झूल्यावर खेळायला गेली असता जम्पिंग झुला चालवणारा आरोपी नामे सय्यद खलील सय्यद कलाम वय ४८ वर्ष रा.सुरजी तालुका अंजनगाव यांनी या मुलीला बाजूलाच असलेल्या कटला ऑटो मध्ये नेऊन तिचे चुंबन घेऊन विनयभंग केला. माहिती मिळताच रहिमापूर पोलिसांनी तात्काळ दखल घेत कलम ७४, ७५(१), ७५(२) भारतीय न्याय संहिता तसेच कलम ८,१२ POCSO कायद्याप्रमाणे तात्काळ गुन्हा नोंद करून आरोपी नामे सय्यद खलील सय्यद कलम यास त्वरित ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.गुन्ह्याचा तपास रहिमापूर पोलीस करत असून या संबंधात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे पोलिसातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे



