ॲड. स्व. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो.से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंतीनिमित्त 18 ते 24 सप्टेंबर 2025 दरम्यान स्मृती सप्ताह सुरू झाला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन गुरुवारी, दि. 18 सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडले. उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. राजेशजी राजोरे (संपादक, दैनिक देशोन्नती, बुलडाणा आवृत्ती) यांच्या हस्ते झाले. यावेळी मा. प्रकाश तांबट (उपाध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. डॉ. प्रशांत बोबडे (सचिव, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. अजिंक्य बोबडे (कोषाध्यक्ष,विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. उबाळे, जयंती उत्सव समितीचे समन्वयक डॉ. देवेंद्र व्यास तसेच संचालक मंडळाचे मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. इंडोर स्टेडियमपासून स्विमिंग पूलमार्गे जाणाऱ्या रस्त्यालगत मान्यवरांच्या हस्ते कडुलिंबाची सुमारे 25 ते 30 रोपे लावण्यात आली. या वृक्षसंवर्धनाची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्व. ॲड. भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरण संवर्धन, पाणी बचत व सामाजिक बांधिलकी यांसारख्या उपक्रमांत गो. से. महाविद्यालय नेहमीच पुढाकार घेत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब बोबडे, उपाध्यक्ष मा. प्रकाशजी तांबट, कोषाध्यक्ष मा. अजिंक्यदादा बोबडे, सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे, संचालक मंडळाचे सदस्य रवि रवी महर्षी, मा. अशोकभाऊ सोनोने, प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर, उपप्राचार्य डॉ. उबाळे यांच्यासह प्रा. डॉ. ठाकूर, प्रा. डॉ. पिढेकर, प्रा. डॉ. रोहिणी धरमकार, प्रा. डॉ. हनुमंत भोसले, प्रा. खंदारे, प्रा. डॉ. अढाऊ, प्रा. डॉ. बोचे, प्रा. काळे मॅडम, प्रा. पुनम तिवारी, प्रा. डॉ. पडघन, डॉ. गोकुळ काळे, प्रा. डॉ. गायकवाड, प्रा. डॉ. आठवर, प्रा. डॉ. चांडक, प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख, प्रा. डॉ. नागरिक आदी मान्यवरांसह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रसिद्धी प्रमुख डॉ. रागीब देशमुख यांनी ही माहिती दिली. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



