Chhatrapati Sambhaji NagarLatest NewsMaharashtra

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार — “मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळात टाकू!”

छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण, हुतात्म्यांना अभिवादन, आणि विकासाच्या योजनांची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभाजवळ ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले आणि उपस्थितांना उद्देशून भावनिक व आश्वासक भाषण केले.

“एकसंघ भारतनिर्मितीचा स्मरणदिन”

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, देवीसिंग चव्हाण यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले,

“मराठवाड्याची मुक्ती ही केवळ विभागीय नव्हे, तर एकसंघ भारतनिर्मितीचा भाग आहे. ही आपली अभिमानाची आणि जबाबदारीची आठवण करून देणारा दिवस आहे.”

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकार तात्काळ मदत देईल.

“शेतकरी आणि ग्रामस्थांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे. एकही नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

“दुष्काळ भूतकाळात टाकण्यासाठी जलसिंचन प्राधान्याने”

मुख्यमंत्री म्हणाले की,

कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणण्यात आलं आहे.

सांगली-कोल्हापूरमधील पुराचे पाणी उजनीमार्गे मराठवाड्यात आणण्यात येणार.

उल्हास खोऱ्यातील ५४ टीएमसी पाण्याचा समावेश आणि

डिसेंबर 2025 पर्यंत डीपीआर पूर्ण होणार असून जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये निविदा प्रक्रिया पार पडणार आहे.

2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची गतीने अंमलबजावणी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलं की 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांवर गतीने आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे, त्यात प्रमुख मुद्दे:

घृष्णेश्वर मंदिर – ₹61 कोटी

तुळजाभवानी मंदिर – ₹541 कोटी

औंढा नागनाथ आराखड्याला मंजुरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा – ₹95 कोटी

253 कोटींची विविध स्मारक आणि मंदिर योजनांची तरतूद

3121 कोटींचे रस्ते प्रकल्प

7719 कोटींची हायब्रिड ॲन्युनिटी योजनांतर्गत कामे

1.14 लाख सिंचन विहिरींचं काम सुरू

छ. संभाजीनगरसाठी पाणीपुरवठा योजना – ₹2700 कोटींची मंजुरी

शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी 2700 कोटींची जलयोजना मंजूर करण्यात आली असून, महानगरपालिकेकडून 800 कोटींचा हिस्सा उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुंतवणूक व रोजगारात झपाट्याने वाढ

ह्युंडाई कंपनीची गुंतवणूक,

EV हब म्हणून छ. संभाजीनगरचा उदय,

लातूर कोच फॅक्टरी अंतिम टप्प्यात — 14,000 रोजगार

अहिल्यानगर ते बीड रेल्वे प्रकल्पाचं स्वप्न पूर्णतेच्या मार्गावर

“स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, नागरिकांचा आशीर्वाद आमचं बळ”

मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात योगदान दिलेल्या कुटुंबीयांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आश्वासन दिलं की,

“मराठवाड्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. नागरिकांचे आशिर्वाद व सूचना आम्हाला दिशा दाखवणारे आहेत.”

उपस्थित मान्यवर:

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, प्रशांत बंब, अंबादास दानवे, आयुक्त श्रीकांत, पोलीस आयुक्त प्रविण पवार, इ. मान्यवर उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button