महाराष्ट्रातील सर्वात मोठा तब्बल 24 तासांचा ट्रॅफिक जाम; 25 किलोमीटर पर्यंत वाहने जागच्या जागी थांबली

पुणे – इंदोर मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक मुळे येवला शहरातून नांदगाव मार्गे वळवली. 24 तासाहून अधिक काळ महामार्ग ठप्प होता.
महाराष्ट्र महामार्गावरील वाहतूक कोंडी : महाराष्ट्रातील सर्वात मोठा तब्बल 24 तासांचा भयानक ट्रॅफिक जाम झाला. 25 किलोमीटर पर्यंत वाहने जागच्या जागी थांबली होती. पुणे – इंदोर मार्गावर ही भयानक वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीत राजकीय नेते मंडळीदेखील अडकली होती. सर्वसामान्य वाहन चालकांना याचा सर्वाधिक त्रास झाला.
येवला ते मनमानड दरम्यान सुमारे 25 किमीपर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मंत्री छगन भुजबळ यांनादेखील या वाहतूक कोंडीचा फटका बसला. पुणे- इंदूर महामार्गावर येवला ते मनमाड दरम्यान 25 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. 24 तासाहून अधिक काळापासून वाहतूक कोंडी झाल्याने वाहन धारक त्रस्त झाले. सिटी न्यूजच्या बातमीनंतर कोपरगावहून मनमाडला जाणारी अवजड वाहनांची वाहतूक नांदगाव मार्गे वळण्यात आली.
पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापनासाठी येवल्यातून अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाद्वारे वळवली. पुणे- इंदोर महामार्गावर येवला ते मनमाड दरम्यान अवजड वाहनांची वाहतूक नांदगाव मार्गे वाहतूक वळवली. पुणे- इंदोर महामार्गावर येवला ते मनमाड दरम्यान 25 किलोमीटर वाहतूक कोंडी. 24 तासाहून अधिक काळापासून वाहतूक कोंडी झाल्याने वाहन धारक त्रस्त झाले होते. कोपरगावहून मनमाडला जाणारी अवजड वाहनांची वाहतूक नांदगाव मार्गे वळवण्यात आली. वाहतूक कोंडी अधिक वाढल्यामुळे पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला.
रायगडमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वाहतूक कोंडीवर मात करण्यात आलीये..रायगडच्या खारपाडा आणि पाली या ठिकाणी एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यावर कोकणात येणा-या वाहनांची नोंद करण्यात येत आहे. वाहनांची संख्या लक्षात घेऊन पुढील वाहतुकीचे नियोजन देखील करण्यात येत आहे.



