Accident NewsLatest News

जळगाव : भीषण अपघात 1 ठार 25 जखमी

जळगाव : जळगाव येथे लालपरीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा-भडगाव रस्त्यावर बस आणि आयशर गाडीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. येथील चोरवड-पारोळा रोडवर हा अपघात झाला.

धुळे-सोयगाव मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांसह जात असताना समोरुन आलेल्या आयशर ट्रकची जोरदार धडक बसला बसली. या भीषण अपघातात बसचा पुढील भाग चेंदामेंदा झाला असून बसमधील प्रवाशांनी अपघातानंतर मोठा आक्रोश केला होता. धडकेनंतर बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसमधील जखमी प्रवासी बाजुलाच असलेल्या शेतात लोळत असल्याचंही दिसून येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर, जखमींना तात्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातातील जखमी असलेल्या 25 पैकी दोन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस व डंपर रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी, पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button