Uncategorized

यवतमाळमध्ये भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत १ ठार २ गंभीर जखमी

वणीहून मुकुटबनकडे जाणाऱ्या दुचाकीला चेंडकापूरजवळ सिमेंट बल्करने जोरदार धडक दिली. अपघातात प्रफुल गागरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुजल व आंचल भोयर हे गंभीर जखमी झाले. ट्रकचालक फरार झाला होता, पण शिरपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वणीहून मुकुटबनकडे जाणाऱ्या दुचाकीला चेंडकापूरजवळ एक सिमेंट बल्करने जोरदार धडक दिली. या अपघातात प्रफुल संजय गागरे या २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याच्या दुचाकीवर मागे बसलेले सुजल भोयर आणि आंचल भोयर हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र शिरपूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत ट्रकचालकाला अटक केली आहे. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ असून या रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरुच असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रशासनाने वाहतुकीसंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button