Latest News

छत्रपती संभाजी नगर गंगापूर खुलताबाद चे आमदार प्रशांत बब यांचा प्रेरणा दाई उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक पेड मां के नाम’ या प्रेरणादायी उपक्रमाची सुरुवात गंगापूर तालुक्यात उत्साहात करण्यात आली. गंगापूर व खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी दिवशी (ता. १९ जुलै) पिंपळगाव येथील भारत माता मंदिर परिसरात वडील डॉ. बन्सीलाल बंब यांच्या साक्षीने वृक्षारोपण करून या अभियानाला सुरुवात केली.

या कार्यक्रमात ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकाचे सादरीकरण यामुळे वातावरणात उत्साहाचे वारं संचारले होते. आमदार बंब यांनी निसर्गाशी एकरूप होण्याचे आवाहन करत प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक तरी झाड लावावे व ते जगवावे असे भावनिक आवाहन यावेळी केले.

“आई जशी आपल्या मुलांना कधी दोष देत नाही, तशीच झाडंही…!” – आमदार बंब
“आईला मुलगा त्रास देतो, तरी ती तक्रार करत नाही. झाडांनाही आपण अनेक कारणांसाठी तोडतो. मात्र, आता वेळ आली आहे की आपण झाडांसोबत नातं निर्माण करावं आणि निसर्गाशी समरस व्हावं,” आमदार प्रशांत बंब

उपस्थित मान्यवरांची यादीही मोठी व प्रभावी
या उपक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये:

  • मातोश्री कांचन बंब
  • डॉ. बन्सीलाल बंब
  • सरपंच मोहन बडोगे

धन्वंतरी डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. जीवन ताजी, डॉ. रणजीत गायकवाड, डॉ. गणेश जाधव, डॉ. जगताप, डॉ. खरात

  • व्यापारी सुरेश मुनोत, प्रीतम मुथा
  • कृषी उत्पन्न बाजार समिती लासूर स्टेशनचे सभापती शेषराव जाधव
  • गटशिक्षणाधिकारी कापसे, विस्तार अधिकारी सकदेव

गावकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या उपक्रमाला उपस्थित होते.

राजकीय उपक्रम नाही, तर सामाजिक बांधिलकी – ‘एक पेड मां के नाम’
हे वृक्षारोपण केवळ एक कार्यक्रम नव्हे, तर आईप्रमाणे निसर्गाशी नातं निर्माण करणारा सामाजिक संदेश देणारा उपक्रम ठरला आहे. या अभियानांतर्गत गंगापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वृक्षारोपणाची साखळी सुरू करण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button